विक्रीसाठी आलेल्या दुकलीस अटक
मुंबई , दि. २९ : चरस विक्रीस आलेल्या तौफिक शमशुल हक अहमद, गंगाप्रसाद चौधरी या दुकलीस खार पोलिसांमी अटक केली. पोलिसांनी एक किलो सात ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले असून त्याची किमत तीस लाखे रुपये आहे. दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खार परिसरात काहीजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.वरिष्ट पोलीस निरीक्षक मोहन माने यांच्या पथकातील उपनिरीक्षक विश्वनाथ आंबोळे, अंमलदार सागर कांबळे, इग्रान शेख, शिंदे, राणे यांनी डॉ. आंबेडकर मार्ग, सारस्वत बँकेसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी रात्री उशिरा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना चरस सापडले.
2243
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा