Ticker

6/recent/ticker-posts

शस्त्र प्रकरणी महिलेला अटक

मुंबई, दि. ३० :  शिवाजी नगर पोलिसांनी गोवंडी येथे महिलेकडून गावठी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. हीना खान असे तिचे नाव आहे.


शस्त्रप्रकरणी हीनाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गोवंडी येथे राहणाऱया एका महिलेकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकला. छापा टाकून तिच्या घरातून गावठी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. हीनाने ती शस्त्रं कुठून आणली होती, ती कोणाला देणार होती, याचा तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या