मुंबई, दि. १७ : बंद पडलेला कारखाना भाडेतत्त्वावर घेत त्यात एमडी ड्रग्ज तयार करून त्याची विक्री करणाऱ्या सोलापूर मधील दोघा भावंडांना अटक करून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल १०० कोटींचे ड्रग्ज बाजारात येण्याआधीच जप्त केले आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या कारवाईत राहुल गवळी आणि अतुल गवळी या दोघा भावांकडून १६ कोटींचे तयार आठ किलो एमडी ड्रग्ज आणि १०० कोटींचा ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चामाल जप्त करून कारखाना सीलबंद केला आहे.
खारदांडा परिसरात हे दोघे ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच नायक यांच्या पथकाने शनिवारी सापळा रचून त्यांच्याकडून ११.७८ कोटींचे ५.०८९ किलो वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. सोलापूर मधील कारखान्यात ड्रग्ज बनवून ते विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली. लगेचच राहुल आणि अतुल यांना सोबत घेऊन पोलिसांनी सोलापूर गाठले. मोहोळ, चिंचोली, एमआयडीसी येथील कारखान्यात छापा टाकत सहा कोटी एक लाख २० हजार रुपये किमतीचे ३.००६ किलो तयार एमडी आणि एमडी बनवण्यासाठी लागणारा तब्बल १०० कोटी रुपये किमतीचा ५० ते ६० किलो कच्चामाल जप्त केला.


2221
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा