चेन्नईतून ठोकल्या बेड्या
मुंबई, दि. १८ : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी चेन्नईतून बेडया ठोकल्या आहेत. साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील यांच्या अटकेने या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या १५ झालेली आहे.
दरम्यान या प्रकरणात अनेक सत्याधारी नेत्यांची नावे चर्चेत असताना दलित पाटील याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. साकीनाका पोलिसांनी एमडी या अंमली पदार्थाची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या सिंडिकेटची उकल करून नाशिक रोड, शिंदे एमआयडीसीतील एम.डी. निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त केला होता. या कारवाई पोलिसांनी १४ जणांना अटक करून एकूण ३०० कोटी २६ लाख १० हजार रुपये किमतीचे १५१ किलो ३०५ ग्रॅम वजनाचे एम.डी. ट्रक जप्त केले आहे. गुन्ह्याच्या तपासात ललित पाटील याचा सहभाग समोर आल्याने पोलिसांची तीन पथके त्याच्या शोध घेत होती. या दरम्यान ऑक्टोबरला पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. मुंबई पोलिसांची पाच पथके आणि पुणे पोलिसांची १० पथके असे एकूण १५ पथके त्याच्या मागे होती. मात्र, गेले पंधरा दिवस तो आपला ठिकाणा बदलत पोलिसांना गुंगारा देत होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा