नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट बूट - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

demo-image

नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट बूट

मुंबई, दि. १४: सणासुदीला वेगवेगळ्या वस्तूंच्या दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन सेल पाहायला मिळतो. मात्र, ब्रांडेडच्या नावाखाली बनावट वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडतात. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वांद्रे येथील स्क्वेअर मॉलमध्ये छापा टाकला असता असाच प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या छाप्यामध्ये तीन कोटी २६ लाखांचे आदिदास, नायकी, तसेच इतर कंपन्यांचे बनावट बूट हस्तगत केले असून विक्रेत्यांची धडपकड केली आहे.

images

वांद्रे पश्चिमेकडील लिंकिंग रोडवरील स्क्वेअर मॉल आणि क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज मॉल मधील काही दुकानांमध्ये आदिदास, नायकी, कॉन्व्हर्स यासारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट बूट आणि स्लीपरची विक्री केली जात होती. ब्रांडेड बुटांप्रमाणे अगदी हुबेहूब उत्पादने दुकानांत ठेवून ग्राहकांकडून तितकेच जास्त पैसे आकारले जात होते. याबाबत तक्रार आल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या मॉलमध्ये छापा टाकला. एकाच वेळी मेन्स ब्युटिक, द हाऊस ऑफ शूज, रेड रॉक शूज या दुकानांमध्ये टाकलेल्या छाप्या मोठ्या प्रमाणात बनावट शूज आणि स्लीपर आढळल्या. दुकानांमध्ये बनावट उत्पादन आढळल्यानंतर पोलिसांनी या दुकानांच्या गोदामातही छापे टाकले या दोन्ही ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये तीन कोटी २६ लाखांचे बनावट बूट आणि स्लीपर्स हस्तगत केले.


गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबत खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

2215


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *