मुंबई, दि. १३ : गेल्या आठवड्यात अंधेरी येथील एका डेअरी व्यवसायिकाच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणी दोन आरोपींना वर्सोवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. वसंत रंगनाथ साबणे उर्फ बाळा आणि आमीन अब्दुल मोमीन खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ४ लाख ६१ हजारांचा चोरीचा मुद्देमान हस्तगत केला आहे. संजय दुधनाथ शर्मा हे अंधेरीतील वर्सोवा गुलमोहर गार्डनच्या पार्क व्ह्यू अपार्टमेंट मध्ये राहतात. ४ ऑक्टोबरला ते त्यांच्या कुटुंबासोबत मालाड येथे गेले होते. रात्री साडेआठ वाजता ते घरी आले असता त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील वीस हजार रुपयांची कॅश, सोन्याचे दागिने असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.
2214
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा