चॉकलेटच्या आमिषाने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

चॉकलेटच्या आमिषाने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण

तीन तासांत अपहरणकर्त्या महिलेला बेड्या


मुंबई, दादासाहेब येंधे : वरळी येथे चॉकलेट देऊन तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके रवाना करून अवघ्या तीन तासात आरोपी महिलेला अटक केली आहे. 


३२ वर्षीय तक्रारदार महिला श्रीमती गुप्ता कुटुंबियासोबत वरळीतील प्रेमनगर परिसरात राहतात. त्यांची तीन वर्षाची मुलगी बुधवारी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणारी मुलगी त्यांच्या घरी आली. एक महिला तुमच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने गल्लीतून खेचून घेऊन गेली आहे असे तिने सांगितले गुप्ता याना सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला व कुटुंबिय घाबरले. त्यांनी प्रेमनगर, वरळी नाका, मद्रासवाडी, वरळी सी फेस या ठिकाणी आपल्या मुलीचा शोध घेतला, परंतु ती सपडली नाही. तातडीने  त्यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ याप्रकरणी पथके रवाना केली आणि अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू केला. सदर पथकांनी संपुर्ण प्रेमनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गंगाराम लॉन्ड्री गल्ली येथील किराणा दुकानाजवळील एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक संशयीत महिला आढळून आली. त्या फुटेजचा व्हिडिओ बनवून पोलीस ठाणेचा व्हाट्सअप ग्रुप, तसेच मोहल्ला कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर व स्थानिक रहिवाशांना पाठविली. प्रेमनगर परिसरात पोलीस पथकांनी कसून शोध मोहीम राबवली. तसेच या शोध मोहिमेत स्थानिक रहिवाशांचीही देखील मदत घेण्यात आली. वरळी नाका, प्रेम नगर येथील खोली क्रमांक ५२० मध्ये राहणारी संशयित महिला पोलिसांना यावेळी मिळून आली. दिपाली बबलु दास असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. तिच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात आली. 


सदरची कारवाई ही मा. वरिष्ठांच्या मागदर्शनानुसार वरळी पालीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र काटकर, दिवसपाळी परिवेक्षक अधिकारी सपोनि कुणाल रुपवते, म.पो.उप.नि.उषा मस्कर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि भालेराव व पथक पो.शि.क्र.१५०४३४/सावकार, पो.शि.क्र.०९०१४६/घुगरे,पो.शि.क्र.११०५९२/खाडे, पो.ह.क्र.०४०९१२/पाटील व दहशतवाद विरोधी पथकातील पो.ह.क्र.०४०४१०/परब, पो.ह.क्र.९६१२८५/कुंभार, पोउपनि आळंदे, म.पो. शि.क्र.०७१२९३/खाके , म.पो.शि.क्र.९३/गावडे यांनी अवघ्या ३ तासात प्रेमनगर झोपडपट्टीत परिसर पिंजून काढत ०३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून पसार झालेल्या महिलेस अटक करून अपहरण मुलीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याची यशस्वी कामगिरी केलेली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज