पळवून नेणाऱ्या सहा जणांना अटक, पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, दि. १२ : दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेल्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात कुरार पोलिसांना यश आले आहे. मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मालाड पूर्व येथे २५ सप्टेंबरला पदा पदपथावर झोपलेल्या एका दोन वर्षाच्या मुलीला अनोळखी आरोपींनी पळवून नेले होते.

तक्रारीनंतर याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला त्यासाठी नऊ पोलीस पथके तयार करण्यात आली होती.
बारा तास उलटल्यानंतर दादर रेल्वे स्थानकावर मुलगी सापडली. मुलगी सापडल्यानंतर कुरार पोलिसांनी मालवणी येथून चार आरोपींना अटक केली. एका आरोपीला मुलुंड आणि दुसऱ्याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या भीतीने आरोपीने मुलीला दादर रेल्वे स्थानकात सोडून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. हे आरोपी एक ते दोन वर्षांच्या मुलांची चोरी करून लाखो रुपयांना लोकांना विकायचे अशी माहिती उघड झाली आहे. रस्त्यावर राहणारी मुले चोरून मूल नसणाऱ्या जोडप्यांना विकण्याचे काम या टोळीकडून सुरू होते असा संशय आहे. एक- दीड वर्षांच्या मुलांसाठी खरेदीदाराकडून दीड ते दोन लाख रुपये या मुले चोरणाऱ्या टोळीला मिळायचे अशी माहिती मिळाली आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. इरफान फुरखान खान (वय ,२६), सलाहुद्दीन नुरमोहम्मद सय्यद (वय, २३), आदिल शेख खान (वय, १९), तौफिर इकबाल सय्यद (वय, २६), रझा अस्लम शेख (वय, २५) आणि समाधान जगताप (वय, ३५) अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा