अंमली पदार्थ हस्तगत
मुंबई, दि. १८ : मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कर विक्रेते आणि नशा करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. या कारवाई मध्ये अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये काहीजण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले. मुलुंड नाक्याजवळ दोन कारमधून आलेल्या साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा, मोहम्मद अजमल कासम शेख, शमशुद्दीन नियाज उद्दीन शहा, इम्रान असलम पठाण, मोहम्मद तौसिफ शौकत अली मन्सुरी, मोहम्मद इस्माईल सलीम सिद्दिकी, सरफराज शाबिर अली खान उर्फ गोल्डन भुरा आणि सना शाबीर अली खान उर्फ प्रियंका अशोक कारकौर यांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. चौकशीमध्ये या आठ जणांनी दिलेल्या माहितीवरून त्यांचा साथीदार रईस अमीन कुरेशी याला कुर्ला येथील त्याच्या घरातून पकडण्यात आले. या सर्वांकडून पोलिसांनी ७० लाख रुपयांचे एमडी, सुमारे दीड लाखांचे चरस, तीन वाहने, सुमारे १७ लाख ९० हजारांची रोकड आणि दहा मोबाईल हस्तगत केले. या सर्व आरोपींवर मुंबई, ठाणे परिसरात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा