मुंबई, दि. १९ : व्यावसायिकाच्या लूट आणि हत्या प्रकरणात ताडदेव पोलिसांनी आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पहिला प्रयत्न फसल्यानंतर घटनेच्या दिवशी आरोपी ५० मिनिटे घरात झाडाझडती घेत होते. सुरेंद्रसिंग उर्फ संजू बना रणधीर सिंग झाला (वय,३५) राजाराम मेधवाल (वय, ३१) या दोघांना अटक केली आहे.

दोघेही राजस्थानच्या झालावाडचे रहिवाशी आहेत संजू भोजनालय चालवायचा तर मेधवाल बँकेत नोकरीला आहे ताडदेव येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर इमिटेशन ज्वेलरी व्यवसायिक मदन अग्रवाल हे त्यांची पत्नी सुरेखा यांच्या सोबत राहायचे या लुटीच्या थरार अग्रवाल यांची पत्नी सुरेखा यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी अटक केलेला सुमित हा त्यांचा नातेवाईक आहे अग्रवाल यांची पत्नी शुभेच्छा नातेवाईक असल्याने त्याच ओळखीवर अग्रवाल यांच्या काळबादेवी कार्यालयात त्याला नोकरीवर ठेवले होते.

अग्रवाल यांची मालमत्ता पाहून त्याची मती फिरली. सुमितचे गाव आणि संजूचे सासर एकच असल्याने दोघांची मैत्री होती. त्याचे अग्रवालच्या मालमत्ता बाबत संजूला सांगताच त्यांनी पुढील प्लॅन आखला. मित्र मेघवाल सहित आणखी एकाला कटक सहभागी केले. १२ तारखेला गुन्हा करण्यासाठी त्यांनी अग्रवाल्याच्या इमारतीत प्रवेश केला. मात्र, हे अग्रवाल वाटेत भेटल्याने त्यांचा गोंधळ त्यांनी 'यहा पे सक्सेना रहते है क्या?'.अशी चौकशी केली. माहिती नसल्याचे सांगून ते मॉर्निंग वॉकला निघून गेले. अग्रवाल बाहेर निघून गेल्यानंतरही आरोपी पुन्हा त्यांच्या घराकडे गेले. दरवाजा ढकलून बघितला. मात्र, दरवाजा न उघडण्याने ते पुन्हा परतले. अग्रवाल यांनी दरवाजा ओढल्याने तो लॉक झाला होता. त्यामुळे त्यांचा पहिला प्रयत्न फसला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा