मुंबई, दि. १३ : स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री मुंबई 'पोलिसांनी शहरात 'ऑपरेशन ऑल' राबवले. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी पाहिजे १३ आणि ४ फरार आरोपींचा शोध घेऊन अटक केली.
शनिवारी रात्री पोलिसांनी शहरात 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवले होते. पोलिसांनी २२९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईत पोलिसांनी १३ पाहिजे आणि ४ फरार तसेच ७९ आजामीन वॉरंटमधील आरोपींना अटक केली.
तर ड्ग्जची विक्री आणि सेवन करणाऱ्या १०१ जणांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. अवैधरीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून चाकू, तलवार असा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील ३४७ आरोपी तपासून ६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. भादंवि कलम ४०१ नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक केल्याची नोंद आहे. तडीपार असलेले आरोपी तपासून ४६ जणांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा