मुंबई, दि. ११ : इंद्रधनुष्यातील सात रंग कितीही मोहक असले तरीही आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजातील तिरंगातील तीन रंगांचे महत्त्व वेगळेच. या तीन रंगांचा समुच्चय म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा. ही ध्वजा सदैव आणि डौलाने दिमाखात फडकत राहणारी. येत्या मंगळवारी देशाचा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या तीन रंगात न्हाऊन निघण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील फोर्ट येथील दुकाने तिरंगा रंगाच्या कपड्यांनी भरून गेले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा