मुंबई, दि. १० : खाजगी कंपनीच्या ईमेलवर फेब्रुवारीत कच्चा माल पुरविणाऱ्या कंपनीच्या आयडीवरून ई-मेल पाठवत बँक डिटेल्स खात्यात बदल झाल्याचा खोटा ईमेल आला होता. ज्यात जवळपास साडेआठ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी नीरज राठोड आणि धर्मेंद्र पांडे या दोघांना नुकतीच अटक केली आहे.

फिर्यादी कंपनीची फसवणूक करत मिळालेली रक्कम राठोडच्या खात्यात जमा झाली होती. अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तोडकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करत आरोपीचा मध्य प्रदेश मधील पत्ता शोधला. तोडकर यांचे एक पथक तिथे रवाना झाले. तेव्हा आरोपी राठोड हा मांडला या ठिकाणी राहायला गेला असे त्यांना समजले. त्यानुसार पोलिसांनी मांडला येथे जाऊन राठोडला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने त्याचे बँक खाते धर्मेंद्र पांडे याला वापरायला दिल्याचे पोलिसांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा