जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे शालेय साहित्याचे वाटप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २६ जून, २०२३

demo-image

जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे शालेय साहित्याचे वाटप

आळंदी येथील धर्मशाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दि. २६ जून २०२३

मुंबई, दादासाहेब येंधे : श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव यांची आळंदी येथील धर्मशाळेत जीवन प्रबोधिनी यांच्या वतीने नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्कूल बॅग, वही, पेन कंपास पेटी वाटपाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. 

व्हिडिओ पहा..👇


प्रसंगी न्यू आनंदचे मालक मेघराज शेट्टी, अमित पवार, शरद आढांगळे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून पासून वांगणी गावात प्राथमिक शिक्षण संस्थेला देखील जीवन प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हातभार लागत आला आहे. गोरगरिबांना कपडे वाटप, स्वेटर वाटप तसेच, अनाथ मुलांसाठी खाऊ वाटप व रुग्णांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे अशा अनेक माध्यमातून ही संस्था कार्य करत असते. 

IMG-20230624-WA0027

'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा! देव तेथेंचि जाणावा!!' हे सत्कर्मी कार्य जीवन प्रबोधिनी संस्थेच्या वतीने सदोदित घडो, हीच श्री चैतन्य कानिफनाथ चरणीं प्रार्थना. असे उद्गार यावेळी आळंदी येथे संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नर यांनी काढले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *