पैशांसाठी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ७ जून, २०२३

demo-image

पैशांसाठी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

पोलिसांनी पाच तासांत गुन्ह्याचा लावला छडा


मुंबई, दादासाहेब येंधे. : कामावरून सुटलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयानी शोध सुरू केला. काही तासात मुलगा सुखरूप हवा असल्यास पाच लाखांच्या मागणीचा फोन आला. या घटनेने खळबळ उडाली. बांगुरनगर पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके कामाला लावून तरुणाचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच गुन्ह्याचा छडा लावत तरुणाची सुटका करण्यात त्यांना यश आले. तपासात वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी मुलानेच अपहरणाचा बनाव केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली.


दहिसर परिसरात राहणारे तक्रारदार दिनेशलाल जोशी (वय, ४८) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा जितेंद्र दोन जोशी (वय, २७) हा मंगळवारी रात्री गोरेगाव लिंक रोड येथून कामावरून घरी निघाला. मात्र, बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास जितेंद्र यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल आला. मुलाच्या सलामतीसाठी बुधवारी सायंकाळी ७ पर्यंत पाच लाखांचे मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व पोलीस व इतर कोणाला कळविल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.


जोशी कुटुंब यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. वेगवेगळी तपास पथके तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुलाच्या मोबाईल लोकेशन तसेच त्याचा येण्याच्या जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० सीसीटीव्ही तपासले. अवघ्या काही तासात त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली आहे.


असा रचला अपहरणाचा बनाव


जितेंद्रकडे केलेल्या चौकशी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कामगाराला जितेंद्र जोशी यानेच चार ते पाच दिवसांपर्यंत एका अडचणीत असल्याचे भासविले. ज्यामधून सुटण्यासाठी त्याचे स्वतःचे अपहरण करून वडिलांकडून पैसे वसूल करण्याचा त्याने कट आखला. यामध्ये मदत न केल्यास त्या कामगाराला कामावरून काढून टाकण्याची धमकी त्याने दिली व त्यामुळे त्याने त्याला मदत।करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दिनांक ३१ मे रोजी जितेंद्र कामावरून सुटल्यानंतर त्याने मित्राकडून पत्नीला फोन लावून वडिलांकडून पाच लाख रुपये आणून देण्यास सांगितले.




%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87



Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *