Ticker

6/recent/ticker-posts

मालवणी येथून सहा लाखांचा गांजा जप्त

मुंबई, २० : गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला मालवणी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. उषा पवार असे तिचे नाव असून तिच्याकडून ६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. मालवणी परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरू केले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी १९ गुन्हे दाखल करून २० जणांना अटक केली आहे. मालवणी परिसरात एक महिला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक निलेश साळुंखे आदींच्या पथकाने तपास करत उषाला ताब्यात घेतले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या