मुंबई, दि. १: मुंबईकरांची रविवारची सकाळ अंधारून आलेल्या आभाळाने उजाडली. आभाळाच्या बदललेल्या रंगामुळे हा पावसाळा आहे की उन्हाळा असा प्रश्न मुंबईकरांसमोर होता. गेल्या आठवड्यात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देऊन पाऊस न आल्याने मुंबईकर निवांत झाले होते. पण, काल रविवारी सकाळी अल्पकाळामध्ये जोरदार सरींनी मुंबईच्या काही भागांमध्ये उपस्थिती लावली आणि त्यानंतर पुन्हा ऊन पडले होते.
रविवारी मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाची उपस्थिती होती कुलाबा, सांताक्रूझ येथे सकाळी पाऊस पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा