जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ‘माझी मुंबई’ या विषयाला अनुसरुन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक ८ जानेवारी, २०२३ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व महानगरपालिका शाळा तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार, शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, श्री. राजू तडवी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार, दिनांक १६ मार्च, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता दामोदर नाट्यगृह, परळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित भव्य अशी महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित केली जाते. स्पर्धेतील विजेत्यांची निवड तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात येते. सन २०२२-२३ या वर्षांत आयोजित बालचित्रकला स्पर्धेत ७७,४५३ बालचित्रकारांनी सहभाग नोंदविला होता. तज्ज्ञ परीक्षकांद्वारे निवड करण्यात आलेल्या ५५२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख स्वरुपातील बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे.
जसंवि/४६०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा