मुंबई, दि. १७ : अवकाळी पावसाचा फटका मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांनाही बसला. सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर जोरदार पाऊस आल्याने गुरुवारी सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागल्या. अवकाळी पावसामुळे लोकलची वायर आणि पेंटोग्राफमधील वीज प्रवाह कमी जास्त दाबाने होत होता. यामुळे भांडुप, भायखळा आणि वडाळा स्थानकांत काही ठिणग्या उडाल्याने रेल्वे गाड्या खोळंबून राहिल्या होत्या. तसेच दिवा आणि डोंबिवली स्थानक परिसरात उपनगरी रेल्वे गाड्या रात्री साडेनऊ वाजेपर्यंत रखडल्या होत्या.
0 टिप्पण्या