हाफ मॅरेथॉन प्रोमो रनला उदंड प्रतिसाद
मुंबई, दि.२६ : अत्यंत धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक व्यायामाच्या अभावातून विविध आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईसारख्या धावत्या शहरांना याचा अधिक धोका आहे. त्यामुळे निरोगी आणि सुदृढ मुंबईकरचा नारा देत महानगरपालिकेने आयोजित केलेल्या 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन प्रोमो रन'ला रविवारी चांगला प्रतिसाद लाभला.
१२ वर्षांच्या मुलापासून ते ८४ वर्षांच्या आजोबांपर्यंत अनेकांनी या अर्ध मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता. तरुणांसह महिलाही यात मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुमारे ४२०० जणांनी यात सहभाग नोंदवून धावण्याचा आंनद लुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा