साडेपाच लाखांच्या विदेशी सिगारेटसह दोघांना बेड्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

demo-image

साडेपाच लाखांच्या विदेशी सिगारेटसह दोघांना बेड्या

मुंबई, दादासाहेब येंधे : भारत सरकारने बंदी घातलेल्या विदेशी ई- सिगारेटची विक्री करणाऱ्या दोन दुकान मालकांना गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अहमद अब्दुल वहाब शहाल आणि उमर फारूक जुबेर आदम अशी या दोघांची नावे असून त्यांच्या जुहू येथील दोन्ही दुकानात ही कारवाई करण्यात आली. या दोघांकडून पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा विदेशी ई- सिगारेटचा साठा जप्त केला आहे.


अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी जुहू पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट तसेच बोगस विदेशी सिगारेटची जुहू आणि सांताक्रुझ परिसरातील काही दुकानात विक्री होत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी या पथकाने जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुहू तारा रोड आणि जुहू चर्च रोडच्या विजय पानबिडी शॉप आणि दि स्मोक शॉप या दुकानात छापा टाकला होता. पोलिसांनी साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम, चार लाख ४५ हजार ५०० रुपयांचा विदेशी ई-सिगारेटचा साठा तर ९६ हजार २५८ रुपयांचा वैधानिक इशारा नसलेले विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *