मुंबई, दि. १९ : करी रोडच्या वन अविघ्न पार्क टॉवर मधील फ्लॅटला आग लागल्याचे घटना ताजी असताना शनिवारी दुपारी घाटकोपरच्या एका पिझ्झा रेस्टॉरंटला भयावह आग लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जन जखमी झाले आहेत. धुरामुळे चार पोलीस घुसमटले. आगीची झळ शेजारच्याच पारेख रुग्णालयाला बसलली असून येथील २२ रुग्णांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घाटकोपर पूर्व येथील पंतनगर येथे विश्वास ही सहा मजली इमारत असून तिच्या तळमजल्यावर जुनोस पिझ्झा रेस्टॉरंट आहे. दुपारी दोनच्या सुमारास इलेक्ट्रिक मीटर रूममध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात रेस्टॉरंट जळून खाक झाले.


0 टिप्पण्या