मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांविरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोशयारी आणि सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. मुंबईतील रिचर्ड्स अँड क्रूडास कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत काल महामोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
राज्यपालांना हटवले नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देतानाच महागाई बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात आगपाखड केली. हा मोर्चा काढून विरोधी पक्षाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा