मुंबई, दि.१९ : कुलाबा ते सीप्झ मेट्रो -३ मार्गीकेमुळे बाधित होणाऱ्या गिरगाव आणि काळबादेवी भागातील रहिवाशांनी मंगळवारी गिरगाव मेट्रोस्थानक परिसरात आंदोलन केले. रहिवाशांनी ठाकुरद्वार ते गिरगाव असा मोर्चा काढला. तसेच यावेळी मेट्रो मार्गिकीचे काम काही वेळासाठी थांबवले. मेट्रो-३ मार्गिकेची उभारणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कडून प्रकल्प बाधितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गिरगाव काळबादेवी बचावकृती समितीच्या वतीने करण्यात आला.

0 टिप्पण्या