मुंबई, दि. १९ : चुनाभट्टी परिसरात गंभीर गुन्हे करून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर परिमंडळ-६ च्या उपयुक्तांनी तडीपरीची कारवाई केली आहे.
चुनाभट्टी परिसरात गंभीर गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा टोळी प्रमुख असलम कुरेशी व त्याचे साथीदार समीर कुरेशी, मुजफ्फर कुरेशी, मोबीन उर्फ शेरू हसनशेख, मुस्ताक सय्यद, फैजान शेख, हसन कुरेशी, शाहरुख कुरेशी यांच्या विरोधात चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत पोचवणे, धमकी देणे, गुरेढोरे, जनावरे ठार मारून किंवा विकलांग करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्र बाळगून गंभीर दुखापत करणे, दंगल घडवून आणणे, पोलिसांवर हल्ला करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे ते चुनाभट्टी पोलिसांनी हद्दीत व आसपासच्या परिसरात लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करीत होते. या टोळीविरोधात वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही त्यांची कृती सुरूच होती. परिणामी, परिमंडळ-६ च्या उपयुक्तांनी या टोळीवर तडीपारीची कारवाई केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा