Ticker

6/recent/ticker-posts

जीवन प्रबोधिनी ट्रस्टची कर्करोगग्रस्त मुलांसोबत दिपावली

जीवन प्रबोधिनी ट्रस्टची  कॅन्सरग्रस्त मुलांसोबत   आगळीवेगळी दिवाळी


मुंबई, दादासाहेब येंधे :  जीवन प्रबोधिनी ट्रस्ट (रजि.) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढणार्‍या चिमुरड्यांबरोबर  रविवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी  मम्माभाई हायस्कुल (हॉल), काळाचौकी, मुंबई येथे दिवाळी साजरी करण्यात आली. सलग १० व्या वर्षी 'चला जगुया आनंदाचे क्षण..' ही संकल्पना घेऊन या आगळ्या वेगळ्या दिवाळीचे आयोजन करण्यात आले. 


व्हिडीओ पहा...👇

लहान मुले गाण्यावर नाच करताना


या कार्यक्रमात लहान मुलांना ब्लँकेट, खेळणी व इतर जीवनावश्यक वस्तु व दिवाळी गिफ्ट वाटप करण्यात आले. तसेच आधारिका फाऊंडेशनच्या दिव्यांग कलाकारांचा कराओके संगीत आणि जादुचे व हास्यमनोरंजन असे कार्यक्रम सादर करण्यात आला. 



सदर कार्यक्रम जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक सत्यवान नर, संस्थापक अमित पवार, अध्यक्ष हेमंत मकवाना, सरचिटणीस गणेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुंबई महानगर पालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, ज्येष्ठ  समाजसेविका सौ. सीमा चंद्रशेखर चोरे, संत गाडगेबाबा संस्था (जे.जे. हॉस्पिटल ) चे विश्वस्त एकनाथ ठाकुर, क्षयरोग स्पेशालिस्ट डॉ. अजय धावले, टाटा हॉस्पिटल समाजसेवक अजय फाटक, वैश्य सभा सरचिटणीस स्वप्निल भोभाटे, अनेक मान्यवर व रंगारी बदक चाळ चे रहीवाशी देखील  उपस्थित होते, 


कर्करोगग्रस्त मुलांनी खूप सदरहू कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला, अनेकांकडून चांगला प्रतिसाद लाभला व  मुंबई महानगर पालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या या कार्याचे  विशेष कौतुक व पुढील काळात कर्करोग मुलांसाठी सहकार्य करु असे सांगितले आणि अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत नाईक यांनी केले. जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली, अशी माहिती रविंद्र जाधव यांनी दिली.

उपस्थित मान्यवर 


मुंबई महानगरपालिका सह आयुक्त चंद्रशेखर चोरे साहेब यांच्या हस्ते मुलांना ब्लॅंकेट व दिवाळी खाऊचे वाटप



दंत चिकित्सा शिबिर

लहान मुलांसोबत जादूचे प्रयोग दाखविताना जादूगार


लहान मुलांसोबत कार्टून 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या