मुंबई, दि. २५ : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आलेल्या यंदाच्या दिवाळीत भीतीचा अंधकार दूर सारत मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सोमवारी मुहूर्ताचे सौदे झाले. दोन्ही शेअर बाजारांच्या विशेष सत्रात गुंतुकदारांनी देशाच्या आर्थिक वाटचालीवर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि पुढील वाटचालीचा भांडवली पठे प्रशस्त केला. गुंतवणूकदाराने भरभराटीच्या मुहूर्ताची नवी अशा जागवत समभागांची खरेदी केली आणि हे संपूर्ण वर्ष भरभराटीचे जावो ही कामना लक्ष्मी जवळ केली.
काल एक तास चाललेल्या विशेष सत्रात गुंतवणूकदारांनी प्राधान्याने बँकिंग, आयटी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्याचे दिसून आले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १४ वर्षांनी प्रथमच मुहूर्ताच्या विशेष सौद्यांमध्ये १५० अंकांपेक्षा अधिक वधारला. ५० कंपन्यांनी बनलेल्या निफ्टी निर्देशांकात ४७ कंपन्यांना फायदा झाला. निफ्टी सौदे पूर्ण होताना १९५ अंकांनी होणारे वधारत १७, ७३१ बंद झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा