Ticker

6/recent/ticker-posts

उघड्या खिडक्या, दरवाज्याच्या खिडकीतून महिलांचे आक्षेपार्ह चित्रीकरण

मुंबई, दि.६ : परिसरातील महिला आंघोळ करीत असतील किंवा कपडे बदलत असतील तेव्हा त्यांच्या घराच्या उघड्या खिडकीतून किंवा दरवाज्याच्या फटीतून गुपचूप मोबाईल मध्ये चित्रीकरण करणाऱ्या तिघा विकृत तरुणांना शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या तिघांनी अशा प्रकारे किती महिलांचे खाजगी चित्रीकरण केले असून त्याचे काय केले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. 



शिवडी येथील बोटहार्ट रोड झोपडपट्टी येथे काही दिवसांपूर्वी दोघा तरुणांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी तुझ्याकडे परिसरातील आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत हे मला माहीत असल्याचे एक तरुण दुसऱ्याला म्हणाला. ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी एका महिलेने सतीशकडे याबाबत विचारपूस केली असता तिचे तसेच अन्य महिलांचे सतीश, स्टीफन नाडर, सरवाना हरिजन या तिघांनी त्यांच्या मोबाईल मध्ये महिलांचे खाजगी चित्रीकरण केल्याचे निष्पन्न झाले. वर्ष २०१९ ते २०२० या कालावधीत हे कृत्य तिघांनी केले होते. वैयक्तिक आनंदासाठी असे कृत्य केल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे उपयुक्त गीता चव्हाण यांनी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या