मुंबई : गुंतवणूकदाराला मोठ्या रकमेचे लोन करून देतो असे सांगून प्रोसेस फी ची डील सुरु असतानाच पोलिसांची रेड पडली असल्याचे भासवून पाच लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या अजहर सईद पटेल, गणेश बेलवटकर, रामसिंह डोलगे यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रामसिंह हा निलंबित पोलीस हवालदार असून त्येच्या विरोधात फसवणुकीचे काही गुन्हे दाखल आहेत. तक्रारदाराला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. काही दिवसांपूर्वी त्यांची भेट अजहरसोबत झाली. अजहरने आपने मोठे कर्ज उपलब्ध करून देतो अशा भुलथापा मारल्या. लोनसाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने पैसे दिले. तेव्हा रामसिंह हा खाकी पॅण्ट घालून तेथे आला. पोलिसांची रेड पडल्याचे भासवून गणेश आणि अजहर हे पैसे घेऊन पळाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा