मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार आदी उपस्थित होते.
सनई चौघडा वादकांना शाबासकी
शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन चौथऱ्यावरून खाली येताना राज्यपालांनी सनई चौघडे वाजविणाऱ्या कलाकारांजवळ थांबून उत्तम वादन केल्याबद्दल त्यांना शाबासकी दिली व बक्षीस दिले.
कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने करण्यात आले होते.
अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. यावेळी संगीत कला अकादमीतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, खा. अरविंद जाधव, किसन जाधव आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा