राजू देसाई यांचे '“शिव चरित्र?! व्याख्यान
मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी लालबाग परिसरातील रंगारी बदक चाळ रहिवाशी संघाचे यंदाचे हे ८२ वे वर्ष असून यावर्षी शनिवार, दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करुन साजरी करण्यात आली.
रंगारी बदक चाळीच्या पटांगणात संपन्न झालेल्या या शिव जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शिवप्रेमी कवी श्री. भाई मयेकर आणि शिवडछात्र मित्रगण यांच्या सौजन्याने सर्जा, रायगडवीर पुरस्कार सन्मानित व शिवचरित्र अभ्यासक व व्याख्याते श्रीमान राजू देसाई यांचे '“शिव चरित्र?! व्याख्यान आयोजित करण्यात आले असे रंगारी बदक चाळ रहिवाशी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देवरुखकर व कार्याध्यक्ष संजय सिंग यांनी सुचित केले.
महाराष्ट्र शासनाच्या कोवीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पध्दतशिर व काटेकोर नियमांचे पालन करून शिवजयंती व शिवचरित्र व्याख्यान हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .यासाठी सचिव मंगेश पिंपरकर, खजिनदार शंकर साळवी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा