Ticker

6/recent/ticker-posts

सलून बाबत नवी नियमावली

ब्युटी पार्लर, जिम ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई : राज्य सरकारने करुणा संकटाच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेत संबंधित निर्बंधांचे नियमावली शनिवारी रात्री जाहीर केली होती. त्यामध्ये सलून ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, जिम, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, दुसर्‍याच दिवशी म्हणजे रविवारी सरकारने आधीची नियमावली बदलून नवीन नियमावली जारी केली. त्यानुसार आता सलून प्रमाणेच ब्युटीपार्लर व जिम ५० टक्के क्षमतेने अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


मास्कविना ज्या सुविधा, सेवा ब्युटी पार्लरमध्ये घेता येत होत्या त्या आता पुढील आदेशपर्यंत घेता येणार नाहीत. पार्लरला गेल्यावर तोंडावरून मास्क हटवता येणार नाही. शिवाय ग्राहक व ब्युटी पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी दोन्ही लसमात्रा घेतलेल्या असणे अनिवार्य आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या