मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने खडक निर्बंध लागू केले आहेत. संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी करू नका, मास्कचा वापर करा. अन्यथा, कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, अद्याप अनेक भागांत नागरिक विना मास्क फिरताना दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापौर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी गर्दीच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. त्यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. विना मास्क बेफिकीर नागरिकांना महापौरांनी कडक शब्दांत समजदेखील दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा