मुंबई : बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके तसेच लेसर प्रकाश (बीम) यांना प्रतिबंध करण्याचे आदेश दि. ७ डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी, २०२२ पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हे आदेश जारी केले आहेत. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, १८६० च्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असून मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, डॉ.शिवाजी राठोड यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.
dgipr
0 टिप्पण्या