बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱया तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे.
या कामामुळे बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ सकाळी १० वाजेपासून गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेदरम्यान संपूर्ण वांद्रे (पश्चिम) म्हणजेच एच / पश्चिम विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सबब, संबंधित नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी अगोदरच्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.
(जसंवि/ ४७३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा