सर्व पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण वेगाने पूर्ण होण्यासाठी आता रात्रपाळीतही विशेष लसीकरण सत्र - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

सर्व पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण वेगाने पूर्ण होण्यासाठी आता रात्रपाळीतही विशेष लसीकरण सत्र

सर्व विभागात एक रात्रपाळी मोबाईल चमू अथवा एक लसीकरण केंद्र कार्यान्वित

मुंबई महानगरातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून आता रात्रपाळीतही विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये रात्रपाळी मोबाईल चमू अथवा एक लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड - १९ साथ आजाराकरिता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु करण्यात आले आहे. प्रारंभी, प्राधान्य गट व त्यानंतर दिनांक १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबई महानगराचा विचार करता आजपर्यंत १०५ टक्के नागरिकांनी कोविड - १९ लसीची पहिली मात्रा व ८० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली आहे. याचाच अर्थ अद्याप २० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. 


तसेच कोविड विषाणूचा ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता, १०० टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे. 


या दोन्ही बाबी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार, तसेच मुंबईकर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण आणखी गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व विभागात एक रात्रपाळी मोबाईल चमू अथवा एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. रात्रपाळीतील हे मोबाईल चमू उपनगरीय रेल्वे स्थानक, झोपडपट्टी व तत्सम वसाहती, बांधकामाच्या ठिकाणी कार्यरत असतील. रोजंदारी मजूर, उशिरापर्यंत नोकरी करणारे कर्मचारी, रस्त्यावर राहणारे नागरिक, फेरीवाले इत्यादी गटातील नागरिकांचे या मोबाईल चमू आणि विशेष लसीकरण केंद्रांद्वारे करण्यात येणार आहे. त्यासोबत, ज्या विभागातील एखाद्या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे शिल्लक असेल तर त्या ठिकाणी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. 


सबब, ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण होणे बाकी असेल, त्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी लगतच्या प्रशासकीय विभागातील विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वार रुम) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


रात्रपाळीत कार्यरत मोबाईल चमू / लसीकरण केंद्रांची प्रशासकीय विभागनिहाय यादी

ए विभागः गणेश मूर्ती नगर / गीता नगर /  मच्छीमार नगर / आंबेडकर नगर.

बी विभागः कच्छी मेमन जमातखाना कोविड लसीकरण केंद्र.

सी विभागः  चंदनवाडी लसीकरण केंद्र / माधवबाग लसीकरण केंद्र / जैन मंदीर लसीकरण केंद्र.

डी विभागः बीपीके सहकारी लसीकरण केंद्र.

इ विभागः बाटलीबॉय कंपाऊंड लसीकरण केंद्र, बाटलीबॉय कंपाऊंड, रामभाऊ भोगले मार्ग, घोडपदेव.

एफ /दक्षिण विभागः पशूवैद्यकीय महाविद्यालय लसीकरण केंद्र, सिंधू नगर, परळ गाव.

एफ /उत्तर विभागः ऍक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय लसीकरण केंद्र.

जी /दक्षिण विभागः वरळी –कोळीवाडा / प्रभादेवी / सासमिरा, वरळी/ लोअर परळ / करी रोड/ जिजामाता नगर.

जी /उत्तर विभागः कोहिनूर वाहनतळ लसीकरण केंद्र, दादर (पश्चिम).

एच /पूर्व विभागः शिवालिक व्हेंचर लसीकरण केंद्र.

एच /पश्चिम विभागः एच /पश्चिम विभाग कार्यालय, दुसरी हसनाबाद लेन, खार (पश्चिम).

के /पूर्व विभागः अंधेरी पूर्व स्थानक मार्ग, विलेपार्ले पूर्व स्थानक मार्ग, विलेपार्ले मंडई. 

के /पश्चिम विभागः अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानक, विलेपार्ले पश्चिम रेल्वे स्थानक, जुहू चौपाटी, जोगेश्वरी पश्चिम रेल्वे स्थानक, लोखंडवाला मंडई, बेहराम बाग, वेसावे चौपाटी, चार बंगला मंडई, अंधेरी मंडई.

पी /दक्षिण विभागः टोपीवाला दवाखाना केंद्र, लक्ष्मीनगर दवाखाना केंद्र, सुंदरनगर दवाखाना केंद्र.

पी /उत्तर विभागः इनसवाडी राठोडी, मालाड (पश्चिम) / मालवणी, मालाड (पश्चिम) / चोक्सी प्रसूतिगृह केंद्र.

आर /दक्षिण विभागः तळमजला, आकुर्ली प्रसूतिगृह लसीकरण केंद्र.

आर /मध्य विभागः पंजाबी गली डायग्नोस्टिक.

आर /उत्तर विभागः आर /उत्तर जुने विभाग कार्यालय.

एल विभागः कोहिनूर मॉल लसीकरण केंद्र.

एम /पूर्व विभागः अयोध्या नगर योग केंद्र लसीकरण केंद्र/ गोवंडी लसीकरण केंद्र / हशू अडवाणी शाळा.

एम /पश्चिम विभागः एम /पश्चिम विभाग वॉर्ड वॉर रूम.

एन विभागः जॉली क्रीडा संकुल लसीकरण केंद्र / घाटकोपर रेल्वे स्थानक.

एस विभागः लाल बहादूर शास्त्री प्रसूतिगृह लसीकरण केंद्र / विनसेंट रिमिडिओस पाटील लसीकरण केंद्र.

टी विभागः पी. के. रोड महानगरपालिका शाळा.













(जसंवि/४७५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज