Ticker

6/recent/ticker-posts

युवा सेनेची इंधन दरवाढीविरोधात राज्यव्यापी सायकल रॅली

मुंबई : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दररोज इंधन दरवाढ होऊन महागाईचा भडक्यात तेल ओतले जात आहे. या महागाईविरोधात सर्वसामान्यांच्या मनातील संतापाला वाट करून देण्यासाठी युवा सेनेच्या वतीने राज्यभरात काल रविवारी सायकल रॅली काढून ठीकठिकाणी आंदोलन करण्यात आले. युवा सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही त्या रॅलीत सहभाग घेत केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध निषेध नोंदवला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या