मुंबई : गृहमंत्रालयाच्या माध्यमातून दिले जाणारे विशेष ऑपरेशन पदक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर आणि पोलीस हवालदार संतोष सावंत यांना जाहीर झाले आहे. हे पदक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या तसेच उच्च पातळीवरील नियोजनपूर्वक राबवलेल्या अभियानासाठी दिले जाते.
गृह मंत्रालयाच्या माध्यमातून पोलीस सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांना विशेष पदकांनी गौरवले जाते. राष्ट्रीय एकता दिवसाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्रालयाने विशेष ऑपरेशन पदकांची घोषणा केली होती. जीवावर बेतून काम करणाऱ्या देशातील २६० जणांना हे पदक जाहीर झाले आहे. त्यात महाराष्ट्र एटीएसचे रामाघरे, जोगळेकर, सावंत यांना विशेष ऑपरेशन पदक जाहीर झाले आहे.
या अधिकाऱ्यांनी राज्यात गोपनीय अभियान राबवून दहशतवादी कृत्य करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले होते. त्यांच्या या कामाची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा