कोपरखैरणे पोलीसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह केली चोरांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

demo-image

कोपरखैरणे पोलीसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह केली चोरांना अटक

 ड्रेनेज पाईप चोरणाऱ्यांना अटक

दिनांक ५/९/२०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान कोपरखैरणे येथील सेक्टर नं. ११, येथील आनंद भवन सोसायटी या ठिकाणी एमआयडीसी व नवी मुंबई महानगरपालिका यांचे ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम सुरू होते. त्याठिकाणी असलेले १००० मी.मी. व्यासाचे सहा मोठे ड्रेनेज पाईप किमंत रूपये ७,००,०००/- कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले होते. सदर प्रकरणाची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गुन्हा.रजि नं. २५२/ २०२९ भाद.वि कलम ३७९ अन्वये दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासा करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप तिदार यांनी स.पो.निरी येवले याच्या आधिपत्याखाली विशेष पथक तयार केले होते. सदर पथकाने गुन्हयाच्या अनुषंगाने सी.सी.टी.व्ही फुटेज, तसेच तांत्रिक तपास करून २४ तासाच्या आत एकुण तीन आरोपींना अटक करून गुन्हयातील सुमारे एकुण ७,००,०००/- रू किमंतीचा शंभर ट्क्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीत यांची नावे :-

१) मोहम्मद हबीब मो. हमीद सिद्धीकी, वय ५३ वर्षे, धंदा- ट्रॉन्सपोर्ट, रा. इंदिरानगर, चिखलवाडी, बैगणवाडी, रोड नं. ९३ बी.एम.सी शाळा क ३ जवळ, गोवंडी, मुबंई

२) अब्दुल शेहमान खान, वय ३८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. रूम नं. बी/१५, पंचशील चाळ सोसायटी, टिळकनगर, साकीनाका, मुबई

३) अक्तर मोहम्मद जफर खान, वय ४७ वर्षे, रा. रूम नं. ४०५, फुट सागर बिल्डीग, बालाजी गार्डन समोर, सेक्टर नं. १२, कोपरखैरणे, नवी मुंबई

वरील सर्व आरोपीत यांस दिनांक ०७/०९/२०२१ रोजी २२:३२ वा अन्वये अटक करण्यात आली असुन, त्यांना दिनांक १९/०९/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत

सदर गुन्हयाचा तपास श्री. बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुक्त, श्री. जय जाधव, सह पोलीस आयुक्त, श्री. सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्‍त, परिमंडळ - १, वाशी, श्री. विनायक वस्त, सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे पोलीस ठाणे, श्री. गजानन कदम, पोलीस निरीक्षक, प्रशासन, व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक श्री. निलेश येवले व श्रीमती. स्मिता पवार, श्री. गणपत पवार, पोहवा/ २०७५, श्री. गणेश चौधरी, पोना/ २९२८, श्री. किरण बुधवंत, पोशि/ ३२७०, श्री. शंकर भांगरे, पोशि/१२१२२, श्री. गणेश गिते, पोशि/१२१३४, श्री. निलेश निकम, पोशि/१२१४९, श्री अमोल भोसले, पोशि/ ३४७४, यांनी अविरत मेहनत घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

%25E0%25A4%2595%25E0%25A5%258B%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2596%25E0%25A5%2588%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A3%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B8+%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A3%25E0%25A5%2587


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *