मुंबई : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात काल शनिवारी दीड दिवसाच्या बाप्पाला मुंबईकरांनी निरोप दिला. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ६ हजार ४७ गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यात कृत्रिम तलावात विसर्जन केलेल्या गणपतींची संख्या सर्वाधिक आहे. समुद्र किनार्यासह नैसर्गिक विसर्जनस्थळी गणेशभक्तांना बंदी घालण्यात आली आहे. शहरात ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृत्रिम तलावात मात्र भक्तांना आपल्या बापाचे स्वतः विसर्जन करता आले.
0 टिप्पण्या