अँपवर नोंदणी करावी लागणार
मुंबई : कोविड प्रतिबंधाच्या दोन्ही लसी घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या स्वातंत्र्यदिवसापासून अर्थात १५ ऑगस्ट पासून लोकल सेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी रात्री सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी सवांद साधताना केली.
सर्वसामान्यांना लोकल प्रवास मिळावा असा जनरेटा वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी काल संवाद साधत कोविडसह विविध विषयांवर भाष्य केले. कोव्हिडचा धोका अजून टळलेला नाही. अजूनही आपण दुसऱ्या लाटेतून सावरलेलो नाही. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही आहे. मात्र, तरीही अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यासाठी राज्य सरकारने एक विशिष्ट अँप तयार केले आहे. एक-दोन दिवसांनंतर हे अँप सर्वांसाठी खुले होईल. असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा