मोटरमनने ट्रेन थांबल्याने अनर्थ टळला
मुंबई, दि. २४ : मुंबई लोकल ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. रोज चाकरमानी या लोकल ट्रेनने ७० लाख प्रवासी प्रवास करतात.
व्हिडिओ पहा...👇
आज बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. माटुंगा स्टेशन जवळ एका कन्स्ट्रक्शन साईटची पराची, बांबू ओव्हरहेड वायरवर पडल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मोटरमनने प्रसंगावधान राखत लोकल थांबल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरून पायी चालत जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा