Ticker

6/recent/ticker-posts

भाजी विक्रेत्याला मारहाण प्रकरणी तिघांना अटक

 दुकान चालवायला न मिळाल्याने मारहाण

मुंबई, दादासाहेब येंधे :  भाजीविक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. २२ ऑगस्ट रोजी माटुंगा परिसरात एका भाजीविक्रेत्याला तिघांना बेदम मारहाण केली होती. सीसीटीव्हीत या मारहाणीची दृश्ये कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. मारहाण करण्यात आलेला भाजीविक्रेता हा यापूर्वी आरोपी उदयकुमार नाडर यांनी भाड्याने घेतलेल्या भाजीच्या दुकानात काम करत होता. मात्र, लॉकडाऊन च्या काळात उदय नाडर याचे दुकान चालत नव्हते. दरम्यान येथील पीडित भाजीविक्रेत्याने ते भाजीचे दुकान मालकाशी बोलून स्वतः चालवायला घेतले. त्यामुळे संतापलेल्या उदय कुमार व इतरांनी त्याला मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी उदय कुमार नाडर, बाळकृष्ण नाडर आणि रमेश यांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या