फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
मुंबई : गुन्हा करून गेल्यावर्षापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या गुन्हेगाराला सापळा रचून अलगद पकडले. गेल्यावर्षी २३ जून२०१९ रोजी ००.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी रिक्षाचालक उमेशकुमार नरेश साह, वय २०वर्षे, राहणार संजय गांधी नगर,विलेपार्ले पोलीस ठाणेच्या पाठीमागे, विलेपार्ले पश्चिम, मुंबई यांनी रिक्षामध्ये प्रवासी आरोपी आकाश शिवराम नाईक व शाकीर शकील शेख यांना घेऊन जात असताना, रिक्षाचालक उमेशकुमार यांना जबरदस्तीने मारहाण करून खिशातील मोबाईल जबरी चोरी करून चाकूने रिक्षाचालक उमेशकुमार यांच्या पोटावर गंभीर दुखापत केली व चाकूने हातावर वार केले तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन्ही आरोपी विरोधात वर्सोवा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १९१/२०१९ कलम ३०७, ३९४, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला गेला होता.
गुन्हा नोंद केल्यानंतर आरोपी शाकीर शकील शेख हा दुबई येथे पळून गेला होता. आरोपी "शाकीर शकील शेख." हा जुलै २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत दुबई येथे वास्तव्यास होता.
नुकताच आरोपी शाकीर शकील शेख हा त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी वर्सोवा गावात येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो नि शेख यांना मिळाली. नमुद बातमीच्या अनुषंगाने कावेरी वाईन शाॅप, वर्सोवा गावा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे सापळा लावून मागील दिड वर्ष पासुन फरार असलेला आरोपी नामे "शाकीर शकील शेख" यास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो नि शेख ,पो.ना. ९६१६४२/गवळी व पो.शि.०६.१०५६/जाधव यांनी शिताफीने ताब्यात घेतले.सदरची कामगिरी व.पो.नि. श्री. राघवेंद्र ठाकुर, पो.नि. देवकर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा