एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई, दादासाहेब येंधे : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात खडसेंचा प्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रसंगी एकनाथ खडसे यांचे अनेक समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हजर होते.

0 टिप्पण्या