मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस कार्यक्षेत्रातील सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथील जनरल हॉलमध्ये एक मुलगी सापडली असून ती तिचे नाव जस्मप्रीत एवढेच सांगत आहे. सदर मुलगी दिव्यांग (मंदबुद्धी) असून तिचे वय सोळा वर्षे आहे. तिचे वर्णन उंची-पाच फूट, रंगाने-निमगोरी, चेहरा-उभट, केस-काळे, दात-वेडेवाकडे आहेत.

या मुलीबाबत किंवा तिच्या नातेवाईकांबाबत कोणाला काहीएक माहिती असल्यास त्यांनी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाणे किंवा मेस्त्री मॅडम मो. क्र.9869122033 यांचेशी संपर्क साधावा.
त्याचप्रमाणे कोणी या मुलीला ओळखत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाणेत किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधणेबाबत आवाहन करण्यात येत आहॆ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा