मुंबई, दि. ११ : काळबादेवीतील कपडे व्यापाऱ्याचे दुकान बनावट चावीने उघडून तब्बल १६ लाख रुपये किमतीच्या साड्यांची चोरी केल्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी साडी व्यापाऱ्यासह तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अनिल निवडुंगे, संतोष मांडवलकर व संदीप शेरेकर अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्या जवळून चोरीचा सहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. येथील जुनी हनुमान गल्ली परिसरात राहत असलेल्या ४७ वर्षीय तक्रारदार यांचा टेक्स्टाईल चा व्यवसाय असून त्यांचे साडी विक्रीचे दुकान आहे. ३ ऑक्टोबरच्या रात्री दुकानाचे कुलूप बनावट चावीने उघडून त्यातून १६ लाख रुपये किमतीच्या साड्या चोरी करण्यात आल्या होत्या.
2211
2211
0 टिप्पण्या