ट्रॉम्बे मध्ये चरस विक्रेत्या दोघांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

demo-image

ट्रॉम्बे मध्ये चरस विक्रेत्या दोघांना अटक

मुंबई : ट्रॉम्बे पोलिसांनी ३० लाख रुपयांच्या चरससह उरणच्या नदीम मोहम्मद इद्रीश शाह (वय,३०) आणि अक्षय लक्ष्मण वाघमारे (वय, २६) दोघा तस्करांना बेड्या ठोकल्या.


ट्रॉम्बे पोलिसांना नदीम हा चरस विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस उपयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर आणि पथकाने सापळा रचून नदीम कडून ७ लाख ९९ हजार इतक्या किमतीचे १ किलो ५९८ ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले. त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता असे चरस त्याचा मित्र अक्षय वाघमारे याच्याकडेदेखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उरण येथे जाऊन अक्षयला ताब्यात घेतले असता त्याची तपासणी केल्यावर त्याच्याकडे २२ लाख २३ हजार रुपयांचे ४ किलो ४४७ ग्रॅम चरस सापडले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. परिमंडळ-६ मध्ये अंमली पदार्थविरोधी गेल्या वर्षभरात ११५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४४ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

2201

Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *