मुंबई, दि. २३ : रात्रीच्या वेळेस महिलेच्या घरातून सोन्याच्या वस्तू चोरी करणाऱ्या ठगास अंधेरी पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. जान आलम उर्फ मैफुज खान असे त्याचे नाव असून त्याने चोरीचे दागिने घराबाहेर एका ठिकाणी लपवून ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत.
अंधेरी पूर्व येथे तक्रारदार महिला राहते. त्यांचा गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी घरासमोर शेड बांधून गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. रविवारी रात्री त्यांचे पती घराला कुलूप न लावता शेड जवळ निघून गेले. दोन तासांनी ती महिला घरी आली तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. चोरट्याने कपाटातून सोन्याच्या वस्तू आणि २५ हजार रुपये चोरले होते. दरम्यान, पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्या फुटेजवरून पोलिसांनी मैफुज यास जोगेश्वरी परिसरातून अटक केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा