बनावट नोटा विकायला आलेल्यास अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २८ जून, २०२३

demo-image

बनावट नोटा विकायला आलेल्यास अटक

मुंबई, दि. २८ : पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला मालवणी पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या आठ बनावट नोटा तसेच अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


कांदिवलीच्या जनकल्याण नगरात राहणारा उमेश कुमार (वय,३२) असे बनावट नोटांसहित पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. मालवणीच्या गणेश मंदिर परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा  विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सपोनि हसन मुलाणी यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक शेळके व हसन मुलाणी यांच्या पथकाने साध्या वेशात त्या ठिकाणी सापळा लावला. खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती हातात प्लास्टिकची काळ्या रंगाची पिशवी घेऊन तसेच एक लहान मुलास सोबत घेऊन सदर ठिकाणी येऊन थांबला. ती व्यक्ती संशयास्पद हालचाल करू  लागल्याने पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा तसेच तीन हजारांची रोकड सापडली. त्याच्या घराची झडती घेतली असता लॅपटॉप, एप्पल कंपनीचा आयपॅड, दोन पेनड्राईव्ह, चार मोबाईल, कोरे बॉंड पेपर, मायक्रो मेमरी कार्ड तसेच त्याच्या राहत्या घराच्या बिल्डिंग पार्किंग मध्ये त्यांच्या ताब्यातील महिंद्रा एसयूव्ही ५०० असा ७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *